संदीप देशपांडे यांनी निधी मंजूर करताना उघडपणे पैसे घेतले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पूर्वी लाज वाटायची, पण आता थेट ऑफिसच्या ड्रॉवरमध्ये पैसे ठेवले जातात. यात गुंतलेल्या अधिकारी, मंत्री आणि आमदारांच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. जोपर्यंत शासन दखल घेत नाही, तोपर्यंत अशी प्रकरणे बाहेर काढत राहण्याचा इशारा देशपांडे यांनी दिला.