शिवसेना पक्ष, चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणांची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेवरील याचिकेवरही आज महत्वपूर्ण निर्णय अपेक्षित आहे. या दोन्ही प्रकरणांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून, निकालाचे राज्याच्या राजकारणावर मोठे परिणाम होण्याची शक्यता आहे.