नागपूरसह विदर्भात आजपासून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील ८ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे खरीप पीकांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून त्यांची चिंता मिटणार आहे.