गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी आता भाजीपाला लागवडीकडे वळले आहेत. केवळ धानावर अवलंबून न राहता, समृद्धीसाठी विविध पिके घेणे आवश्यक आहे हे कृषी विभागाने केलेल्या प्रयोगातून समोर आले. परजिल्ह्यांवरील भाजीपाला अवलंबित्व कमी करण्यासाठी हा बदल महत्त्वाचा आहे. यंदा रब्बी हंगामात तब्बल १०१४.९० हेक्टर क्षेत्रात भाजीपाला लागवड झाली असून, यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल.