तुमच्या वाहनावर दादा, मामा, भाई अशी फॅन्सी नंबरप्लेट असेल तर ती त्वरित बदलून घ्या. मुंबईत आरटीओने अत्याधुनिक रडार प्रणाली असलेल्या इंटरसेप्टर वाहनांद्वारे कठोर कारवाई सुरू केली आहे. ही वाहने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांचे चेहरे आणि गाड्यांचे क्रमांक टिपून चालान पाठवत आहेत. वेगवान वाहनचालक, हेल्मेट नसलेले आणि सीट बेल्ट न वापरणारेही या कारवाईच्या रडारवर आहेत.