मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगाला नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका ऐनवेळी लांबणीवर टाकल्याबद्दल तीव्र शब्दात झापले आहे. न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय टाळता येण्यासारखा असून, तो योग्य नसल्याचे स्पष्ट केले. आयोगाच्या या भूमिकेवर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.