अकलूज येथील धवल श्रीराम मंदिराच्या विस्तीर्ण पटांगणात महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीने फेस्टिव्हल 2025 व भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याने अकलूजला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हा फेस्टिवल पाहण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून दररोज वीस ते पंचवीस हजार नागरिक येत आहेत. या फेस्टिव्हल मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, महिला बचत गटांचे स्टॉल्स, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि मनोरंजनात्मक उपक्रम असल्याने फेस्टिव्हलला मोठी गर्दी होत आहे. या फेस्टिवलच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाची उलाढाल अकलूज मध्ये होत असल्याची माहिती जनसेवा संघटनेचे सर्वेसर्वा धवलसिंह मोहिते पाटील यांनी दिली आहे.