७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील संचलनात महाराष्ट्राच्या 'गणेशोत्सव' चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल पश्चिम महाराष्ट्रातील सहभागी कलाकारांचा साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस येथे श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.