नक्षल सत्ताहा दरम्यान राज्याच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या बंदोबस्त करण्यात आला आहे. माओवाद्यांचा नेता असलेला बसवा राजू याच्या मृत्यू झाल्याने हा शहीद सप्ताह माओवादी साजरा करीत आहेत. 28 जुलै ते 3 ऑगस्टपर्यंत होणाऱ्या या माओवाद्यांच्या आठवड्यात माओवादी कोणतेही घटना घडवू नये म्हणून नक्षलविरोधी पोलीस पथक जंगली भागात रवाना झाली आहेत. राज्याच्या शेवटच्या भाग असलेल्या सिरोंचा तालुक्यातील कालेश्वर जवळ तेलंगणा पोलिसांनी तपासणी नाके लावले आहेत.