महाराष्ट्र सरकारने 2026 च्या अर्थसंकल्पात पर्यटन विकासाचे मोठे उद्दिष्ट ठेवले आहे. 2047 पर्यंत राज्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या 16 कोटींवरून 38 कोटींपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे. यासाठी मुंबई, सिंगापूर आणि दुबईत पर्यटन गुंतवणूक कक्ष सुरू केले जातील, तसेच पर्यटन स्थळांच्या पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणावर भर दिला जाईल.