11 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील नाशिक आणि अहमदनगरमध्ये तापमान 14-15 अंशांपर्यंत खाली येऊ शकते. तर मुंबईत 25 ते 28 अंश सेल्सिअस तापमान राहील. हलका वारा वाहण्याची शक्यता असली तरी, सध्या पावसाचा अंदाज नाही. पुणे आणि नागपूरसह इतर विभागांमध्येही हवामानाची स्थिती अपेक्षित आहे.