मुंबईतील वसई विरार नालासोपारा अचोले रस्ता पाण्याखाली गेलाय. वसई विरार नालासोपारामध्ये आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. रिमझिम पावसासह अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे. या सतत पडणाऱ्या पावसामुळे नालासोपारा पूर्व सकल भागातील मुख्य रस्त्यावर पाणी साचले आहे. आभाळ काळेकुट्ट झाले असून, दिवसभर पावसाची संततधार सुरूच राहण्याची शक्यता आहे.