महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये आरक्षणाचा तिढा कायम आहे. २७ टक्के ओबीसी आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एकूण आरक्षण ५० टक्क्यांच्या पुढे गेले आहे. या महत्त्वपूर्ण मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, आरक्षणाच्या भवितव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा अखेरचा दिवस आहे.