भंडारा कोणत्या विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी महायुतीकडून बाउंसरांचा वापर करण्यात आला. शिवसेनेचे मतदार हे बाऊंसरांच्या गराड्यात मतदान केंद्रावर उतरलेत. भंडारा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू असताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता भंडारा पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मात्र आपला मतदारही सुरक्षित मतदान केंद्रावर पोहोचावा या दृष्टीने महायुतीने बाउंसरांचा वापर केल्याचे चित्र भंडाऱ्यात बघायला मिळाल.