छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या महायुतीच्या बैठकीत जागावाटपावर कोणताही तोडगा निघालेला नाही. हिंदू मतदानाची विभागणी टाळण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे संजय केणेकर यांनी म्हटले आहे. महायुती हिंदुत्व आणि विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढणार असून, शहराच्या विकासावर लक्ष केंद्रित करेल.