महेंद्र दळवी यांनी तटकरेंचे नाव न घेता राजकीय प्रतिस्पर्ध्यांवर निशाणा साधला आहे. "ते डॉन असतील तर मीही डॉन आहे," असे म्हणत त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमधील विजयानंतर आपली भूमिका स्पष्ट केली. जिल्ह्याच्या राजकारणात आपली पकड मजबूत झाल्याचे संकेत दळवी यांनी दिले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.