महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि सुनील तटकरे यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. राज्यामध्ये राष्ट्रवादी तर रायगडमध्ये सुनील तटकरे यांच्या रूपाने घरात शत्रू पाळल्याचे ते म्हणाले. महायुतीनंतर राष्ट्रवादीला सत्तेत घेतल्याने रायगडला मोठा फटका बसत असून, आमदार बदनाम होण्याचा धोका थोरवे यांनी व्यक्त केला.