भुसावळ शहरातील माहेश्वरी समाजाच्या वतीने उभारण्यात आलेल्या ‘महेश स्तंभ’ या नव्या उपक्रमाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. उद्घाटन प्रसंगी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.