माहीम प्रभादेवीमधील पराभवानंतर शिंदेंच्या शिवसेना आणि भाजपमधील वाद चिघळला आहे. भाजपने निवडणूक काळात प्रिया सरवणकर यांच्या विरोधात मेसेज फिरवल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. या आरोपांनंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून सायबर पोलिसांत तक्रार दाखल करण्याची तयारी केली आहे.