माहुली गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या दोन तरुणांना दिशा चुकल्यामुळे गडावरच अडकून पडावे लागले होते. सध्या पावसाळी वातावरण असल्याने तसेच अंधार असल्याने ते दोघेही तिथेच अडकले होते. पण सुदैवाने हेल्प फाउंडेशनच्या जीव रक्षक दलाने केलेल्या थरारक बचावकार्यामुळे या दोन्ही तरुणांना सुखरूप खाली आणण्यात यश आले. त्यांच्या या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होतं आहे.