नंदुरबार शहरातील रस्त्यांची दुरवस्था आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शहरातील प्रमुख मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनार गल्ली परिसरातील रस्ता अक्षरशः खड्डेमय झाला असून, "रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता" अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.