नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी मक्याच्या लागवडीत मोठी वाढ झाल्यामुळे बाजार समितीत मक्याची आवक विक्रमी प्रमाणात होताना दिसून येत आहे. आतापर्यंत बाजार समितीत तीन लाख क्विंटलपेक्षा अधिक मका दाखल झाला असून, पुढील महिनाभर आणखी आवक सुरू राहण्याची शक्यता आहे.