महादेव कोळी जातीचे एस टी प्रवर्गातील प्रमाणपत्र एक वर्षापासून पाठवपुरवा करूनही प्रमाणपत्र मिळाले नाही. यामुळे अर्जदाराच्या पतीने बीडच्या माजलगाव मध्ये चक्क मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे. बीडच्या धुनकवाड गावातील भाग्यरती गायकवाड यांनी महादेव कोळी जातीच्या प्रमाणपत्रासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली मात्र अधिकारी प्रमाणपत्र देत नाहीत. यामुळे हनुमंत जमादार यांनी टावर वर चढून आंदोलन सुरू केले आहे.