ठाणे : उन्हाळा तीव्र होत असतानाच ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्याला पाणीटंचाईच्या भीषण झळा सोसाव्या लागत आहेत. तालुक्यातील 'वाघवाडी' या गावात सद्यस्थितीत पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, येथील ग्रामस्थांना, विशेषतः महिलांना पाण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे.