मकर संक्रांतीच्या पवित्र पर्वावर आज शिर्डीतील साई समाधी मंदिरात भक्तीचा अनोखा रंग पाहायला मिळत आहे. मकर संक्रांत सणानिमित्त नाशिक येथील देणगीदार आणि साईभक्त कैलाश शहा यांच्या देणगीतून साई मंदिर आणि परिसरास करण्यात आलेली फुलांची आकर्षक सजावट यामुळे मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.