सातारा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने नगराध्यक्ष पदासाठी अनेक जण इच्छुक असताना साताऱ्याचे कवी मनाचे नेते बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी देखील सातारच्या नगराध्यक्ष पदासाठी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. साताऱ्यामध्ये मागील 25 वर्षापासून खड्डे ,रस्ते, बागा यांची अवस्था मी पाहतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिकलेल्या प्रतापसिंह हायस्कूलचे राष्ट्रीय स्मारक बनवायचंय बरोबरच साताऱ्याला सितारा बनवणार असल्याने सातारकरांनी मला नगराध्यक्ष बनवा असे आवाहन बिचुकले यांनी केले आहे.