बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरचे नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्ष अतिक जवारीवाले यांचा नोटा उधळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विजयाच्या जल्लोषात त्यांनी मिरवणुकीत हवेत नोटा उधळल्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला असून, सार्वजनिक पदाच्या जबाबदारी आणि विजय साजरा करण्याच्या पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.