मालेगाव महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज विक्री प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. शहरातील २१ प्रभागांतून ८४ नगरसेवक निवडले जाणार आहेत. प्रशासनाने ७ ठिकाणी अर्ज स्वीकृती केंद्रे उघडली असून, ऑफलाइन अर्जही स्वीकारले जात आहेत. सकाळपासूनच इच्छुक उमेदवार आणि समर्थकांची गर्दी दिसून येत आहे, यामुळे निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे.