मालेगाव महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू असून विविध राजकीय पक्ष प्रचारात उतरले आहे. दुसरीकडे महापालिका प्रशासन मतदानाचा टक्का वाढावा, जनजागृती व्हावी यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवित आहे..यामध्ये मालेगाव शहरातील तृतीयपंथीयांना एकत्रित करून त्यांना मतदान करण्याबाबत जनजागृती करत मतदान करण्याची शपथ देण्यात आली.