मालेगावात एकाच ठिकाणी ८०० हून अधिक संशयास्पद मतदार कार्ड आढळल्याने खळबळ उडाली आहे. मतदान केंद्राजवळच्या घरातून ही कार्ड जप्त करण्यात आली असून ती बोगस असल्याचा संशय आहे. निवडणूक अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून पंचनाम्याचे कामही सुरू आहे. या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.