मालेगावसह नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागात टरबूज उत्पादनात मोठी वाढ होताना दिसत आहे. यावर्षी टरबूज व खरबूजाला बाजारात चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा या पिकांकडे कल वाढला आहे. कमी कालावधीत चांगले उत्पादन आणि तुलनेने अधिक नफा मिळत असल्याने अनेक शेतकरी पारंपरिक पिकांऐवजी टरबूज-खरबूज लागवडीकडे वळत आहेत.