मालेगाव तालुक्यातील सातमाने येथे खाजगी कंपनीच्या प्रदूषणामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. धुरातून होणाऱ्या प्रदूषणाने आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन पुकारले आहे. रयत क्रांती सेनेचे सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून, महिलांचाही यात सक्रिय सहभाग आहे. वारंवार तक्रारी करूनही कंपनी बंद न झाल्याने ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.