आदिमाया सप्तशृंगी देवीचा चैत्रोत्सव रामनवमीपासून सुरू झाला आहे. कसमादेसह खानदेशमधील लाखो भाविकांचे पायी यात्रेने गडावर जाणार आहेत. येथील चाळीसगाव चौफुली ते दाभाडी या बारा किलोमीटरच्या रस्त्यावर दानशूर व स्वयंसेवी संघटनांकडून ठिकठिकाणी यात्रेकरुंच्या सेवेसाठी स्टॉल उभारले जात आहेत.