नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रेला सुरूवात झाली .. देवस्वारीने यात्रेला सुरूवात झाली.. . येळकोट येळकोट जल मल्हारचा जयघोष करत, देवस्वरीवर हळद, खोबरा, बेल भंडाऱ्याची उधळन करत, हराजो भाविक यात्रेत सहभागी झाले होते.. खंडोबाची भारतातील ही सर्वात मोठी यात्रा आहे... पाच ते सात दिवस ही यात्रा चालते. .. माळेगाव येथे खंडोबाचे पुरातन मंदीर आहे... इथे खंडोबा आणि म्हाळसाकांत यांच्या मूर्ती मंदिरात आहेत... महाराष्ट्रातीलच नव्हे तर, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाना, आदी राज्यातुन भाविक खंडोबाचा नवस फेडण्यासाठी इथे येतात... या यात्रेत पशू प्रदर्शन देखील लक्षवेधी असते. .. पंजाब, राजस्थान, गुजराथ इथून व्यापारी या यात्रेत येतात... माळेगव यात्रेत घोड्यांचाही मोठा बाजार भरतो... शिवाय सर्वच प्रकारच्या विविध वस्तू विक्रीसाठी व्यापारी इथे 5 दिवस व्यवसाय करतात.