माळशिरस तालुक्यातील निमगाव येथे 75 वर्षांच्या अजोबांचा गजीढोलाच्या तालावर नाचतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. निमगाव येथील खंडोबा मंदिरासमोर दररोज भक्त गजीढोलाच्या तालावर पारंपरिक खेळ खेळतात. या खेळात तरुणांसह वृद्धांचाही उत्साहाने सहभाग असतो. याच पार्श्वभूमीवर बाबुराव पवार आणि दिनकर मगर या 75 वर्षीय आजोबांनी गजीढोलाच्या तालावर ठेका धरत खेळ सादर केला.त्यांच्या उत्साहपूर्ण नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.