माळशिरस इथं संस्कृती सातपुते यांच्या जिल्हा परिषद प्रचारात एक अनोखं चित्र पहायला मिळालं. त्यांचं चार महिन्यांचं बाळ, महालक्ष्मी सातपुते, प्रचारात आणि जाहीर सभेतील स्टेजवरही सक्रिय सहभागी झालं होतं. मंत्री आणि नेत्यांच्या मांडीवर बसून प्रचारात रंगत आणणाऱ्या या चिमुकलीची सध्या चांगलीच चर्चा आहे.