सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे समुद्रात बोट बुडाल्याची घटना घडली आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यामागे सागरी पोलीस आणि एका खाजगी बोटीच्या गस्तीदरम्यान ही दुर्घटना घडली. बुडालेल्या बोटीवरील पाच व्यक्ती सुदैवाने सुखरूप आहेत. स्थानिक मच्छीमारांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि जलद बचावकार्यामुळे सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.