सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दोन नंबरच्या बुरुजाला जवळजवळ ३ मीटर रुंदीचे मोठे भगदाड पडले. काही दगड हलल्यामुळे हे भगदाड पडल्याची माहिती किल्ल्यावरील रहिवासी असलेले मंगेश सावंत यांनी दिली आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीतील किल्ल्यांपैकी सिंधुदुर्ग किल्ला असून किल्याची तटबंदी ढासळत आहे.