मालवणचा यंदाचा पर्यटन हंगाम ऐतिहासिक ठरला आहे. तब्बल 5 लाख 35 हजार 160 पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जलदुर्गाचे दर्शन घेतले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 35 हजारांनी पर्यटक वाढले आहेत.महाराष्ट्र सागरी मंडळाच्या आदेशानुसार पावसाळी धोके लक्षात घेऊन 26 मेपासून 31 ऑगस्ट 2026 पर्यंत मालवणातील जलपर्यटन, वॉटर स्पोर्ट्स व किल्ले वाहतूक बंद करण्यात आली आहे.