अकोला जिल्हातल्या पातूर तालुक्यातील शिर्ला गावाने आज अभिमानाने उंच भरारी घेतली आहे! कारण या छोट्या गावातील मामा-भाचा जोडीने एकाचवेळी एमपीएससी परीक्षेत चमकदार यश मिळवत क्लासवन अधिकारी बनण्याचा मान मिळवला आहे. शिर्ल्यातील राजेंद्र घुगे आणि त्यांचा भाचा प्रतीक पारवेकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनुक्रमे बारावा आणि चौथा क्रमांक मिळवून गावाचं नाव राज्यभर उज्ज्वल केलं आहे