गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. पाटील टोला येथील लक्की बागडे या युवकाचा साप चावल्याने मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पाटील टोला येथे कोब्रा साप आढळल्याची माहिती लक्की बागडेला मिळाली. ना कोणतं प्रशिक्षण, ना कोणती सुरक्षाव्यवस्था... केवळ मस्तीखोरीच्या नादात लक्की साप पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोब्राने त्याला चावा घेतला. दंश झाल्यानंतर तातडीने त्याला तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्राथमिक उपचार सुरू असतानाच त्याची प्रकृती अधिक बिघडली. त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.