मुंबईच्या भिवंडी येथील साईभक्त संतोष नार्वेकर यांनी साईचरणी सोन्याचे आकर्षक असे दोन दिवे अर्पण केले आहेत. 72 ग्रॅम वजनाच्या या सुवर्ण दिव्यांची किंमत 11 लाख रुपये असून मध्यान्ह आरतीच्या वेळी हे दिवे साई चरणी ठेवण्यात आले होते. साईबाबा संस्थानच्या वतीने देणगीदार साईभक्त संतोष नार्वेकर यांचा सहपरिवार सत्कार करण्यात आला.