मुंबई लोकलमधील महिला सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे. एका पुरुषाने बुरखा परिधान करून महिलांच्या डब्यात प्रवेश केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना मध्य रेल्वेच्या घाटकोपर स्थानक परिसरात घडली आहे. प्रवाशांच्या लक्षात येताच महिलांमध्ये भीती व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.