पुणे जिल्ह्यातील मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीत एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. आम आदमी पार्टीचे उमेदवार सलीम बशीर इनामदार यांना केवळ एकच मत मिळाल्याने त्यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत शंका उपस्थित केली आहे. या प्रकरणी आता त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी दर्शवली आहे.