पहिल्यांदाच निवडणूक पार पडलेल्या मंचर नगरपंचायतीत दोन उमेदवारांना मतदारांनी समान कौल दिला. मग चिठ्ठी उचलण्याचा निर्णय झाला अन या चिठ्ठीने शिंदे शिवसेनेच्या लक्ष्मण पारधी यांचं नगरसेवक पदाचं दार उघडलं. चिठ्ठीत त्यांचं नाव आल्याचं ऐकून लक्ष्मण यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.