मांडवा जेट्टीची रचना अत्यंत धोकादायक अवस्थेत पोहोचली आहे. जेट्टीचे मुख्य खांब गंभीरपणे कमजोर झाले असून ठिकठिकाणी प्लास्टर गळून लोखंडी सळया बाहेर येत आहेत. या ढासळलेल्या स्थितीमुळे जेट्टीची अवस्था धोक्यात आली असून दररोज या मार्गाने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.