अमरावती शहरात आंब्याची आवकही वाढली आहे. हापूसचा पर्याय पायरी आंब्याला शहरात मागणी वाढली आहे. अमरावती शहरात दररोज ४० टन आंब्याची आवक होत आहे. फळांचा राजा आंब्याचा हा सुगंध असून सध्या शहरात दररोज किमान ४० टन आंब्याची आवक होत आहे. त्यामुळे खवयांची चंगळ असून रस खाण्यासोबतच आंब्याच्या फोडी चाखण्याचा आनंद घरोघरी घेतला जात आहे.