नुकसानभरपाई मिळावी यासाठी सिंधुदुर्गात 12 मार्च रोजी आंबा आणि काजू बागायतदारांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार असून या अनुषंगाने आज कुडाळ तालुका आंबा-काजू बागायतदारांची बैठक पार पडली. या बैठकीला माजी आमदार वैभव नाईक यांची मुख्य उपस्थिती होती. त्यांनी उपस्थित बागायतदारांना मार्गदर्शन केले. या मोर्चास कुडाळ तालुक्यातून मोठ्या संख्येने बागायतदार उपस्थित राहतील. कृषी विभागाने 90 टक्के आंबा-काजू पिकाचे नुकसान झाल्याचा अहवाल सादर केला आहे. शासनाने बागायतदारांसाठी तरतूद करावी. अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.