अंबाजोगाई तालुका हा दुष्काळी पट्ट्यात येत असला, तरी जिद्द आणि सरकारी योजनांच्या जोरावर शेतीचे नंदनवन कसे फुलवता येते, हे पठाण मांडवा येथील शेतकरी लक्ष्मण जोगदंड यांनी दाखवून दिले आहे. डोंगरदऱ्यात असलेल्या आपल्या ८ एकर जमिनीपैकी एका एकरात त्यांनी आंब्याची फळबाग फुलवली असून, त्यातून ते वर्षाकाठी दीड लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहेत.