पोषक वातावरणामुळे वाशिम जिल्ह्यात गावरान आंब्यांना चांगला मोहोर आला असून उन्हाळ्यात मुबलक आंबे खायला मिळण्याची शक्यता आहे. मागील महिनाभरात पडलेली चांगली थंडी आणि स्वच्छ वातावरण यामुळे आंब्याला भरगच्च फुलोरा आला असून फुलराणी बहरलेली आंब्याची झाडं आकर्षक दिसताहेत.